Vadgaon Sheri Assembly Constituency | शरद पवारांकडून पुण्यात भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराकडून ‘तुतारी’ला मतदान करण्याचे आवाहन (Video)

Bapu Pathare-Tutari

पुणे : Vadgaon Sheri Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपाला (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) मोठा धक्का दिला आहे. आगामी निवडणुकीत ‘तुतारी’च (Tutari) आपले चिन्ह असल्याचे भाजपाच्या माजी आमदाराने जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/reel/C_qPL_6pazL/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) हे सध्या भाजपमध्ये आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते ‘तुतारी’ हातात घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, शनिवारी सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळांना भेट देत असताना वेगळंच चित्र पाहायला मिळाले.

आगामी विधानसभेसाठी आपण ‘तुतारी’ हाती घेणार असून, तुतारीला मतदान करण्याचे आवाहन बापूसाहेब पठारे यांनी मंडळांना केले. कार्यकर्त्यांना आवाहन करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘तुतारी’वर लढणार असल्याचे यात ते जाहीर करताना दिसत आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बापूसाहेब पठारे इच्छुक आहेत. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने पठारे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात फिल्डिंग लावली होती. त्यांनी काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा होती. (Vadgaon Sheri Assembly Constituency)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed