Chhagan Bhujbal On Ajit Pawar | ‘अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत’, अजित पवारांच्या विधानावरील चर्चेवर भुजबळांचा विश्वास; म्हणाले…

Chhagan Bhujbal-Ajit Pawar

नाशिक : Chhagan Bhujbal On Ajit Pawar | राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये (Baramati Lok Sabha) शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बाजी मारली. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला कुणाचा ? याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळालं.

सुनेत्रा यांचा पराभव अजित पवारांसाठी हा फार मोठा धक्का होता. तसेच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं बारामतीमध्ये अजित पवारांनी या पराभवाबाबत खंत व्यक्त केली.

“आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी आमदार मिळायला हवा. मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकि‍र्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकि‍र्दीची तुलना करा.

मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. जर यंदाच्या निकालासारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं”, अशी टिप्पणी बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

त्यावरून अजित पवार बारामतीतून विधानसभा (Baramati Assembly) लढणार नसल्याची चर्चा सुरु झाली.
त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून,
ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. ते निवडणूक लढविणारच असून,
दादांनी लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याबाबत व्यथा मांडल्याचे भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal On Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed