Sanjay Raut On Ajit Pawar | ठाकरे गटाच्या नेत्याची अजित पवारांबद्दल राजकीय भविष्यवाणी; म्हणाले, बारामतीतून…

मुंबई : Sanjay Raut On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Assembly Election 2024) शंका उपस्थित करत आपण बारामतीमधून (Baramati Assembly Election ) लढणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कार्यक्रमात दिले. “आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी आमदार मिळायला हवा. मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा.
मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा. जर यंदाच्या निकालासारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं”, अशी टिप्पणी बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव झाला तसेच अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच लीड मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच अजित पवारांनी हे वक्तव्य केले.
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले, अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना आहे.
त्यामुळे आता मी त्यांच्यावर काय बोलू?.
“तुम्ही तुमचे घर मोडले. तुमचा पक्ष सोडला. शरद पवार, जे तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत.
ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिले, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल,
तर पश्चात्ताप करुन काय उपयोग?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा