Fake Disability Certificate Case | बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा दाखल; पुजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे आले उजेडात

Fake Certificate Scam

अहमदनगर : Fake Disability Certificate Case | अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करुन बनावट प्रमाणपत्र तयार करुन कर्णबधीर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हस्तगत करणारे चौघे व सिव्हिल हॉस्पिटलमधील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्था येथे काम करणारा शिपाई व जिल्हा रुग्णालय ए आर टी सेंटर येथे काम करणारा कंत्राटी कर्मचारी यांनी रुग्णालयाचा आय डी व पासवर्डचा वापर करुन या चौघांची माहिती अपलोड केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

सागर भानुदास केकाण Sagar Bhanudas Kekan (रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी), प्रसाद संजय बडे Prasad Sanjay Bade (ता. पाथर्डी) सुदर्शन शंकर बडे Sudarshan Shankar Bade (रा. येळी, ता. पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे Ganesh Raghunath Pakhre (रा. माणिक दौंडी, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव विठ्ठलराव डावरे (Dr. Sahebrao Vitthalrao Davre) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी संबंधित व्यक्ती हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह हजर राहून केस पेपर काढतात. संबंधित व्यक्तीची त्यांचे अपंगत्वाचे प्रकारानुसार वैद्यकीय तपासणी होऊन ती व्यक्ती दिव्यांग, अपंग असल्यास त्याच दिव्यांगाचे प्रकार व प्रमाणानुसार त्याची सर्व माहिती संबंधित विभागातील वैद्यकीय अधिकारी केसपेपरवर नोंद करतात. त्याच्या केसपेपरवरील अहवालानुसार डाटा इंट्री ऑपरेटर हे जिल्हा रुग्णालयाचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर सर्व माहिती अपलोड करतात़ त्यानंतर प्रमाणपत्र तयार होते.

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आय एस एस अधिकारी पुजा खेडकर (Puja Khedkar Case) हिने नगर सिव्हिल हॉस्पिटलमधून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले होते. त्यामुळे येथील हॉस्पिटलमधून देण्यात आलेल्या सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या चौघांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात यांना ज्या दिवशी प्रमाणपत्र दिले गेले, त्यादिवशी जावक रजिस्टरला कुठलीही नोंद आढळून आली नाही. या रुग्णांची तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण या कर्णबधीर असल्याची कुठलीही वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे कळविले आहे.
त्यामुळे या चौघांनी शासकीय योजनाचा फायदा मिळावा, म्हणून सिव्हिल हॉस्पिटल
येथील कोणाला तरी हाताशी धरुन जिल्हा रुग्णालयाचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करुन
बनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची व सिव्हिल हॉस्पिटलची फसवणूक केली आहे. तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed