Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule’s Son | चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या; जखमींची प्रकृती गंभीर; संजय राऊतांचे गंभीर आरोप

नागपूर: Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule’s Son | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेने (Sanket Bawankule) नागपुरात आपल्या आलीशान ऑडी कारने एका दुचाकीसह चार ते पाच वाहनांना उडवले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गाडी चालवताना तो नशेत असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणात बावनकुळे यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena UBT), खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, ” जोपर्यंत या राज्याचे गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, तोपर्यंत या राज्यात कुठल्याही गुन्ह्याचा प्रामाणिक तपास होणार नाही. जोपर्यंत रश्मी शुक्ला डीजी आहेत, तोपर्यंत प्रामाणिक तपास होणार नाही. कायद्याला खरेदी केलं जात आहे. लोक त्यांच्या गाडीखाली चिरडली जात आहेत आणि तक्रारीत नावही नाही. लाहोरी बारमध्ये कोणी नशा करत होतं, कोण गाडीत बसलं, कोण गाडी चालवत होतं, याचं सीसीटीव्ही फुटेज होते, जे आता उपलब्ध नाही “, असा आरोप राऊतांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” गाडीवरील नेमप्लेट का काढली, जर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबाचा या अपघाताशी काही संबंध नसेल तर ही चोरीचपाटी का केली. जो शेहजादा गाडी चालवत होता तो तर नशेत होता. त्याला वाचवण्यात आलं आहे. हे सारं प्रकरण समोर आल्यानंतर, कायदा किती भ्रष्ट झालेला आहे, खास करुन जिथून फडणवीस येतात त्या शहराची ही स्थिती आहे.
जर दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता तर आतापर्यंत फडणवीसांच्या फौजेने आमच्यावर हल्ला चढवला असता. पण, आज तो तुमच्या प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे, नशेत होता, गाडी चालवत होता, या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत आणि एफआयआरमध्ये नाव देखील नाही “, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा