Chandrashekhar Bawankule At Bhau Rangari Ganpati | “पुनीत बालन यांच्या मनात राजकारण नसून समाजकारण”, चंद्रशेखर बावनकुळेंकडून कौतुक; घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Punit Balan-Chandrashekhar Bawankule

पुणे: Chandrashekhar Bawankule At Bhau Rangari Ganpati | आज (दि.१०) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आज गणरायाचं दर्शन घेतलं. या दर्शनाच्या माध्यमातून बुद्धीची देवता बुद्धी देईल. आमच्या या महाराष्ट्राच्या जनतेला सुखरूप ठेवेल. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, महिला बहिणी, युवा यांना प्रचंड मजबुती देईल अशी प्रार्थना आम्ही बाप्पाकडे केली आहे. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)

https://www.instagram.com/reel/C_vXS4JJT6M/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

पुनीत बालन (Punit Balan) आणि विश्वस्त यांचे आभार. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे जीवन मंगलमय राहो, अशी प्रार्थना केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्याकडून बावनकुळे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://www.instagram.com/p/C_vLBeLpYCp

मविआ कडून पुनीत बालन यांच्यावर झालेल्या टिकेवरून माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जर अशी टीका कोणी करत असेल तर ते दुर्दैवी आहे. कारण पुनीतने कधीही राजकारण डोक्यात ठेवून समाजप्रबोधन, गणेशोत्सव साजरा केला नाही.

https://www.instagram.com/p/C_u-HZMpjqO

पुनीतने या पुण्यात, राज्यात आपल्यासारख्या सर्वांना गणरायाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी हा उत्सव केला आहे. पुनीतच्या मनात राजकारण नसून समाजकारण आहे. पुणे शहराच्या प्रतिष्ठेसाठी ते काम करत आहेत. टीका बाजूला ठेवून पुनीतने काम करावे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी बावनकुळे यांच्या सोबत भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/C_ms6AoJzuD

You may have missed