Pune Crime News | हॉटेलमालकासह मुलगा, ग्राहकांना मारहाण करुन जखमी करणाऱ्या माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल, लोणी काळभोरमधील जगदंबा हॉटेलमधील घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  जेवण झाल्यानंतर ऑनलाईन बिल आले का अशी विचारणा करताना झालेल्या शाब्दीक वादावादीतून चौघांनी हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि ग्राहक यांना हाताने मारहाण करुन जखमी केले. लोणीकाळभोर पोलिसांनी माजी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कदमवाक वस्ती येथील जगदंबा हॉटेलमध्ये ९ नोव्हेबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

https://www.instagram.com/p/Dfl-te5pJyv

याबाबत हॉटेल मालक राजेंद्र यदु चौधरी (वय ५६, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल दत्तात्रय काळभोर (Rahul Dattatray Kalbhor), रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर (Ramchandra, alias Rambhau Dattatray Kalbhor), स्वप्निल काळभोर, विकास काळभोर (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चौधरी यांचे कदमवाक वस्ती येथे जगदंबा हॉटेल गेल्या ३० वर्षापासून आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेलमध्ये रामचंद्र  काळभोर हे जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर त्यांनी जेवणाचे ऑनलाईन बिल पेड केले. त्याने हॉटेल मालक राजेंद्र चौधरी यांना बिल आले का असे विचारले. त्यावर त्यांनी त्याला बिल आले आहे, असे सांगितले. त्यावर रामचंद्र काळभोर यांनी शिवीगाळ करुन नीट बोल, असे बोलले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक भांडणे सुरु झाली. भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा मयुर चौधरी त्या ठिकाणी आला व तो रामचंद्र काळभोर यांना समजावुन सांगू लागला. तेव्हा त्यांनी त्याला देखील शिवीगाळ करुन धक्का बुक्की करुन मारहाण केली.

मयुर याने रामचंद्र काळभोर यांना हॉटेल बाहेर काढले. त्यानंतर थोड्या वेळाने रामचंद्र काळभोर हे त्यांचा भाऊ राहुल दत्तात्रय काळभोर याला घेऊन हॉटेलवर आला. त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर मयुर चौधरी हा या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर, विकास काळभोर हे हॉटेलमध्ये आले. स्वप्निल याने बडीशेपची काचेचे भांडे राजेंद्र चौधरी यांच्या  तोंडावर मारले. त्यावेळी हॉटेलमधील एक ग्राहक दीपक रमेश कुकरेजा यांनी राहुल काळभोर यांना तुम्ही नीट बोला, शिवीगाळ करु नका, असे समजावुन सांगितले असता त्यांनी कुकरेजा यांना देखील शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी हॉटेलमधील कामगार मिराज ऊर्फ शममुल अन्सारी याने मयुर याला फोन करुन ही घटना सांगितली . त्यानंतर मयुर व पुतण्या ओम चौधरी हे दोघे पोलीस ठाण्यातून हॉटेलकडे येत असताना हॉटेल जवळील डॉमिनोज पिझ्झा समोर राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर, विकास काळभोर यांनी मयुर व ओम यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. लोणी काळभोर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार चंद्रकांत माने तपास करीत आहेत.

You may have missed