Murder Of Lover In Wakad | धक्कादायक ! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून मध्यरात्री मृतदेह ठेवला रिक्षात

Murder Of Lover In Wakad

पिंपरी : Murder Of Lover In Wakad | पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक (Pimpri Chinchwad Murder) घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी (Wakad Police) दिली. शिवानी सुपेकर (Shivani Supekar) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. आज (दि.११) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. (Murder Of Lover In Wakad)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed