National Highway Toll Rules | राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल; 20 किलोमीटर मोफत प्रवास करता येणार, पण

Toll Tax Rule Change | No full toll on incomplete expressways from February 15: Big relief for drivers

मुंबई: National Highway Toll Rules | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क धोरण लागू करण्यात आलेले आहे. (National Highway Toll Rules)

यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने फास्टॅग सोबतच प्रायोगिक तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (GNSS) नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार २० किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग, स्थायी पूल, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्ता.. या मार्गावरील सुरुवातीचे २० किलोमीटर मोफत प्रवास करता येणार आहे. राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या नियमांनुसार लाभ घेता येणार नाही.

वाहनाने २० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला तर वाहनधारकांकडून पुढच्या
२० किलोमीटरप्रमाणे फीस वसूल केली जाईल. या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी चालकांचा बोझा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed