Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Parking On Road

पुणे: Parking Charge On Pune Major Roads | शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सतावताना दिसत आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे. अशातच आता पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation – PMC) राज्य सरकारकडे काही प्रमुख रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र पुणेकर याला विरोध करतील अशी शक्यता आहे.

पुणे शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर होणार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पार्किग शुल्क आकारण्या संदर्भातील प्रस्ताव पाठवला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी शुल्क आकारण्यासंदर्भातील हा प्रस्ताव आहे.

पाच प्रमुख रस्त्यांवर दुचाकीसाठी प्रति तास १० ते २० रूपये तर चाकी वाहनांसाठी प्रति तास ५० ते १०० रूपये असे शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची परवानगी आयुक्त राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारकडे मागितली आहे.

खालील पाच प्रमुख रस्त्यांवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

-जंगली महाराज रस्ता,
-विमाननगर रस्ता,
-फर्ग्युसन रस्ता,
-औंध, डीपी रस्ता,
-बालेवाडी हाय स्ट्रीट रस्ता

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed