Eknath Khadse On BJP Leader | ‘भाजपच्या बड्या नेत्याची अश्लील क्लिप माझ्याकडे….’ एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा; म्हणाले – “दिल्लीतील वरिष्ठांना…”

eknath khadse

मुंबई: Eknath Khadse On BJP Leader | एकनाथ खडसे नेमके राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (Sharad Pawar NCP) आहेत की भाजपात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच राष्ट्रवादीत २०२० ला प्रवेश करताना माझ्यामागे ईडी (ED) लावली, तर मी त्यांच्यामागे CD लावेन, असं एकनाथ खडसेंनी म्हंटले होते. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीचे आमदार झाले. लोकसभेआधी त्यांनी घरवापसीची निर्णय घेतला. पण भाजपकडून त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा झाली नाही. आता या सर्व घडामोडींवर खडसे यांनी भाष्य केले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, ” त्यांनी ईडी म्हटलं म्हणून मी सीडी म्हटलं होतं. मी यमक जुळवलं होतं. त्या ओघात मी बोललो. पण माझ्याकडे काही कागदपत्रं, क्लिप होत्या, असा धक्कादायक गौप्यस्फोट खडसेंनी माध्यमांशी बोलताना केला.

‘माझ्या मोबाईलमध्ये भाजपच्याच एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती. मुलीसोबत काय चाळे चालले आहेत ते बघा, असं वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं.

माझ्याकडे त्या नेत्याची अश्लील क्लिप होती. पण नंतर ती क्लिप माझ्या मोबाईलमधून
कशी काय डिलीट झाली, काही कल्पना नाही. मुक्ताई वर माझी श्रद्धा आहे.
मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे क्लिप होती. पण ती क्लिप कशी डिलीट झाली,
ते माहीत नाही. भाजपमधील वरिष्ठांना, दिल्लीतील वरिष्ठांना मी ती क्लिप दाखवली होती. त्यांनी ती पाहिली होती, असं खडसेंनी म्हंटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed