Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता

Vidhansabha

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय नेते दौरे करत सभा घेत आहेत. इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाच्या भेटी घेत आहेत. ही सर्व तयारी सुरु असताना विधानसभा निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार अशी चर्चा होती.

मात्र आता राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मुख्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.

यावरून आता राज्यात आगामी विधानसभा निवडणूका कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था त्याचबरोबर मतदानावेळी किती कर्मचारी आहेत यांची माहिती घेण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाही. यावरून सर्वत्र चर्चाही रंगली होती. महाराष्ट्रातील निवडणुका कधी होणार? राज्यातील निवडणूका लांबणीवर का पडल्यात ? असा प्रश्न चर्चेत आला होता.

तर पत्रकार परिषदेतही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते की, ‘महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. येत्या काळात गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्यानं अजून तारीख जाहीर झालेली नाही’ मात्र आता लवकरच राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कोणी साहेब होत नाही; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला टोला

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed