Pune Crime Branch News | तडीपार गुुंडाला कोयत्यासह पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केली कारवाई

पुणे : Pune Crime Branch News | सराईत गुंड सनी हिवाळे याच्या खून प्रकरणातील आरोपी व तरुणावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) करणारा गुंड आकाश कसबे याला तडीपार केले असतानाही तो शहरात येऊन कोयता घेऊन फिरत होता. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने त्याला कोयत्यासह अटक केली.
आकाश नामदेव कसबे Akash Namdev Kasbe (वय २८, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस हवालदार उज्वल मोकाशी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) सनी हिवाळे हा जामीनावर सुटला होता. आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी एप्रिल २०२२ मध्ये सनी हिवाळे याच्यावर हल्ला करुन त्याचा खून केला होता. तसेच आकाश कसबे व त्याच्या साथीदारांनी मे २०२२ मध्ये पद्मावती चौकात चंद्रकांत कांबळे यांच्यावर सपासप वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी आकाश कसबे याला १७ जुलै २०२३ रोजी पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तो पुणे शहरात आला होता.
गणेशोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथकातील पोलीस हवालदार उज्वल मोकाशी, कुंभार, चव्हाण असे
सहकारनगर परिसरातील हिस्ट्रीशिटर व रेकॉर्डवरील गुन्हेगार रविारी चेक करत होते.
त्यावेळी तडीपार गुंड आकाश कसबे हा त्याच्या घराजवळील उकिरंड रेशनिंग दुकानाच्या मागे कोयता घेऊन फिरत असल्याची बातमी हवालदार चव्हाण व मोकाशी यांना मिळाली.
चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना कळविले.
त्यानुसार पोलिसांनी उकिरंडे रेशनिंग दुकानाला चारही बाजूने घेरुन आकाश कसबे याला कोयत्यासह पकडले़.
तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा कसबे याच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार किरण कांबळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली