Amol Balwadkar News | कोथरूड विधानसभा : भाजप नेते अमोल बालवडकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; उद्या आशिर्वाद मेळाव्याद्वारे मोठे शक्ती प्रदर्शन करणार

Amol Balwadkar

पुणे: Amol Balwadkar News | विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरातील चर्चेत असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून उद्या रविवार (दि.६) आशिर्वाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (Kothrud Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DAvcA8TPBG2/?igsh=ZTdjd2h3MGphZWg=

या मेळाव्याद्वारे अमोल बालवडकर मोठे शक्ती प्रदर्शन करणार असून त्यांची आगामी राजकीय भुमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, या मेळाव्यासाठी ३५ ते ४० हजार नागरिकांसाठीची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी जर्मन हँगर पद्धतीची भव्य मांडव व्यवस्था आहे. यावेळी सर्व नागरिकांना दिवाळी सरंजाम किटचे वाटपही करण्यात येणार आहे.

या मेळाव्याबाबत बोलताना बालवडकर म्हणाले, “मी ज्यांना व्हीआयपी मानतो.
अशा कोथरूड मतदार संघातील जनतेसोबत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर जनता रुपी व्हीआयपी बसणार आहेत.
ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे”, अशी भुमिका बालवडकर यांनी घेतली आहे.
दरम्यान अमोल बालवडकर कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ratnagiri Assembly Constituency | विधानसभेत उदय सामंतांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती;
भाजपचा नेता आयात करण्याच्या हालचाली

Shivsena Thackeray Vs Shivsena Shinde Group | ‘सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट’,
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘मला इंजेक्शन देऊन…’

You may have missed