Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘फलटणमधून मला फोन आला अन्…’

sharad-pawar

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. आता आगामी विधानसभेसाठी महायुतीकडून रणनीती आखत मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे महाराष्ट्र दौरे वाढलेले दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/DA0DKugJoEc

केंद्रीय नेत्यांचे दौरे महाराष्ट्रात वाढत असतानाही महायुतीला गळती लागण्याचे चित्र आहे. अनेक नेते महायुतीला रामराम करत महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. त्यामध्ये अधिकची इन्कमिंग शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

आज (दि.७) भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. दरम्यान त्यांच्या उमेदवारीचे संकेत देत असताना शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार म्हणाले, ” इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच कुठूनतरी फोन आला. म्हणाले १४ तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला… (Phaltan Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB

असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संकेत दिले आहेत. तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास १ महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पक्षातील इन्कमिंग वर भाष्य केले आहे.

https://www.instagram.com/p/DA0CYlbiKVw

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली मात्र….’, शरद पवारांची दत्ता भरणेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘बारामती अन् इंदापूरात मलिदा गँग…’

Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’

Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

You may have missed