Amol Kolhe On Jayant Patil | ‘…तर राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद जयंत पाटलांना मिळणार”, अमोल कोल्हेंच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या; राजकीय वर्तुळात चर्चा

Amol Kolhe - Jayant Patil

सांगली: Amol Kolhe On Jayant Patil | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्ष तयारी करताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. दरम्यान सत्ता कोणाची येणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) खासदार अमोल कोल्हे यांनी सांगलीमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान (Shivswaraj Yatra) महत्वाचे विधान केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद हे जयंत पाटील यांना मिळणार असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DA0Sw14CCf-

अमोल कोल्हे म्हणाले, ” महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अजून दोन बैठका बाकी आहेत. त्यामुळे मी आता काही म्हणत नाही. मात्र, तुम्हाला माहिती आहे की, सांगली जिल्ह्यात त्या पदाच्या बाबतीत खूप मोठा बॅकलॉक झाला. पण मग तुमच्या सर्वांच्या खाद्यांवर जबाबदारी येते.

https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB

सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे, अशी भूमिका जर तुम्ही सर्वांनी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील सर्वोच्च पद जे असेल ते जयंत पाटील यांच्याकडेच असेल.

https://www.instagram.com/p/DA0Fm32pWQa

कारण महाराष्ट्रात जेव्हा पक्षांची वाताहत होत होती. पक्षाचं काय होणार? असा प्रश्न पडला होता.
त्यावेळी जयंत पाटील यांनी मेहनत घेतली.
मला अभिमान वाटतो की मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो जे नेतृत्व सुसंस्कृत आहे,”
असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DA0CYlbiKVw

“आता सध्या राज्यातील ८० मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या.
ज्या आमदारांनी कोणत्या न कोणत्या प्रलोभनाला बळी पडून भूमिका बदलली, निष्ठा बदलली,
आता त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला असेल की आपल्या आमदाराने गद्दारी केली मग
आता बॅनर्सवर दमदार आमदार लिहायचं की गद्दार आमदार लिहायचं?”
असं म्हणत अमोल कोल्हेंनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

https://www.instagram.com/p/DAz9kqwC8hK

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Dattatray Bharne | ‘इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली मात्र….’, शरद पवारांची दत्ता भरणेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘बारामती अन् इंदापूरात मलिदा गँग…’

Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी सगळंच काढलं; म्हणाले – ‘दिल्लीश्वरांकडून शरद पवारांना ईडीची नोटीस, नमवण्याचे आटोकाट प्रयत्न’

Pimpri Assembly Constituency | पिंपरी विधानसभेत लढण्यास इच्छुक; ‘या’ महिला नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

You may have missed