Shivsena Shinde Group On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंचं सर्वकाही आधीच ठरलं होतं, मग इतका आटापिटा कशाला’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई: Shivsena Shinde Group On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही नेत्यांना घेऊन भाजपसह (BJP) सत्तेत सहभागी झाले. दरम्यान बंडाच्या वेळी नेमकं काय घडलं होतं त्याबाबत आता विविध दावे केले जात आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बरोबर हातमिळवणी करीत असताना भाजपाकडून ऑफर आली होती, असा खुलासा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DA0QJTTJNPE
पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील अशी ऑफर भाजपाने दिली होती. मात्र तरीही ठाकरे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेले. एकनाथ शिंदेंनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
https://www.instagram.com/p/DA0NS3KpNqB
संजय शिरसाट म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं ठरलं, त्यावेळी आम्ही सगळे मातोश्रीवर होतो. आम्ही डोळ्यासमोर पाहत होतो. २०१९ ला निकालात शिवसेना- भाजपा बहुमत आले होते. सर्वकाही ठरले होते, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद यावरही भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमची हे मान्य केले.
https://www.instagram.com/p/DAz6HUcpoq6
परंतु कुणीतरी एक जण चर्चेला पाठवा. परंतु चर्चेला माणूस पाठवला नाही. तुला जायचं तर तू जा असं एकनाथ शिंदेंना म्हटलं. हे सर्व आधीच ठरले होते, भाजपासोबत जायचंच नाही मग इतका आटापिटा कशासाठी केला होता असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला. पदासाठीच हे सर्व केले, त्याला कारणीभूत संजय राऊत असा आरोपही शिरसाटांनी केला.
https://www.instagram.com/p/DAz8W8YJ20_
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा