Hadapsar Pune Crime News | नाकाबंदी दरम्यान पोलिसांना धक्काबुक्क करणार्‍या मोटारसायकलस्वारास अटक

Pune Crime News | A young man was beaten up and stabbed in the stomach over money for digging a well near his village; Wagholi police arrested three people

पुणे : Hadapsar Pune Crime News | नाकाबंदी दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकलस्वाराला थांबून ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्‍या मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Police Nakabandi)

https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv

मधुकर सरदारसिंग ठेंग ऊर्फ पाटील (रा. कुबेरा विहार, संजीवनी हॉस्पिटलच्या समोर, हडपसर) असे या
मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार गोकुळ भोसले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मगरपट्ट मेनगटजवळ १० ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DBA2jpoJCg3

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना मगरपट्टा मेनगेटवर होते. यावेळी एक मोटारसायकलस्वार विरुद्ध दिशेने आला. पोलिसांनी त्याला थांबवून लायसन्स दाखविण्यास सांगितले. त्याने मद्यपान केल्याचा संशय आल्याने ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यास सांगितले. त्यास त्याने नकार देत त्यांनी शिवीगाळ केली. पोलीस पैसे मागतात, असे बोलून पोलिसांची बदनामी केली.

फिर्यादी व पोलीस निरीक्षक खांडे यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला.
तरीही त्याने शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून येऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली.
पोलिसांनी मधुकर ठेंग याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DBA0znWCVw3

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी !
संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय;
म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’

You may have missed