Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

ajit-pawar-devendra-fadnavis

वाशीम: Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला (Mahayuti Seat Sharing Formula) जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार, भाजप (BJP) १५५ ते १६० जागा, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) ८० ते ८५ जागा आणि अजित पवार गटाला ४५ ते ५० जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा मित्रपक्षाला सोडल्या जाणार आहेत. लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC

दरम्यान जागावाटपात मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (Chandrakant Thackeray) यांनी महायुतीला इशारा दिला आहे. कारंजा विधानसभेसाठी (Karanja Assembly Constituency) उमेदवारी न दिल्यास वाशीम (Washim Assembly Constituency) आणि रिसोड विधानसभेतही (Risod Assembly Constituency) माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DBA7bJ9CAzj

चंद्रकांत ठाकरे हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे तिकीट मागितले आहे. मात्र, हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी इथून दोनवेळा निवडून आले होते. आता त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

https://www.instagram.com/p/DBA6Jqli0WE

भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या गोष्टीची कुणकूण लागताच चंद्रकांत ठाकरे नाराज झाले आहेत. जागावाटपात युतीधर्माचे पालन केले जाणार नसल्याने ठाकरे यांनी थेट महायुतीला इशारा दिला आहे.

https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv

“उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून २०२९ ची विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभेत थांबलो होतो.
पण आता मात्र मला थांबायचं नाही. मी निवडणूक लढवावी अशी माझ्या निकटवर्तीयांची
तसेच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला विधानसभेत उभं करण्याचं ठरवलं आहे.

https://www.instagram.com/p/DBA2jpoJCg3

आगामी विधानसभेत महायुतीने उमेदवारी न दिल्यास इथे मैत्रीपूर्ण लढत होईल तसेच वाशीम
आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील”, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/DBA0znWCVw3

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed