Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

Sharad Pawar-Dhananjay Munde

बीड: Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर धंनजय मुंडे यांनी अजित पवारांची (Ajit Pawar NCP) साथ देत ते महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. दरम्यान आता आगामी विधानसभेला शरद पवारांनी धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी खास रणनीती आखलेली आहे.

https://www.instagram.com/p/DBA7bJ9CAzj

त्यासाठी पवारांनी एका नवा दमाच्या तरूण उमेदवाराला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation Andolan) असलेला परिणाम पाहता इथं जो उमेदवार पवार रिंगणात उतरवणार आहेत त्यामुळे इथली लढत ही चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

https://www.instagram.com/p/DBA6Jqli0WE

परळी विधानसभा मतदार संघात (Parli Assembly Constituency) धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणाला उतरवायचे याची चाचपणी शरद पवार करत आहेत. परळीच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एन.के. देशमुख यांची छाप होती. त्यांचे पुतणे अभिजीत देशमुख (Abhijit Deshmukh) हे सध्या राजकारणात सक्रीय आहेत.

https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC

ही बाब हेरून पवारांनी देशमुख यांनाच परळीतून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अभिजित देशमुख यांनी उमेदवारीबाबत पुण्यात मुलाखतही दिलेली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

https://www.instagram.com/p/DBBCQxvimXL

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed