Sanjay Raut On Shivsena Shinde Group | ‘आता डुप्लिकेट मेळावे…’, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले – ‘आजचा दसरा मेळावा विधानसभेच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार’

Sanjay-Raut-Eknth-shinde

मुंबई: Sanjay Raut On Shivsena Shinde Group | दसरा मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena Thackeray Group), खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ” या देशात ५० वर्षापेक्षा अधिक काळ एकच दसरा मेळावा होतो, जिथे विचारांचं सोनं लुटलं जातं. तो म्हणजे शितीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. (Shivsena Dasara Melava 2024)

https://www.instagram.com/p/DBBELqmCMkO

माझ्या माहिती प्रमाणे देशात दोन मेळावे होतात, एक नागपूरात आरएसएसचा (Rashtriya Swayamsevak Sangh – RSS) आणि मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. आता मेळाव्याची लाट आली आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात मेळावे करतात”, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

https://www.instagram.com/p/DBA9cYUi9FC

संजय राऊत म्हणाले, ” प्रत्येक दसऱ्याला विचारांचं सोनं बाळासाहेब ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला देत राहिले. आता तिच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली आहे. तुम्ही भले पक्षाचं चिन्ह नाव चोरले असेल तरीही विचार, जनता ही मुळ शिवसेनेसोबत आहे.

https://www.instagram.com/p/DBA7bJ9CAzj

निवडणूक आयोग शिवसेना कोणाची हे ठरवू शकत नाही. या राज्यातील जनतेने हा निर्णय घेतला आहे. आजचा दसरा मेळावा हा विधानसभेच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार आहे. आज एक दिशा महाराष्ट्राला लाभेल”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DBA6Jqli0WE

ते पुढे म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मोठ्या विजयाची मानकरी ठरली, विधानसभाही त्याच पद्धतीने आम्ही जिंकू. आमच्याकडे मशाल हे चिन्ह आहे, ते चिन्हही ऐतिहासिक आहे. औरंगजेबाच्या सेनेला कात्रजचा घाट दाखवला तेव्हा मशालींचा वापर केला होता, शिवरायांपासून मशालीला महत्व आहे, ती मशाल आमच्याकडे आहे”, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed