Bibvewadi Pune Crime News | पुजार्‍याचे अपहरण करुन कर्नाटकात डांबून ठेवून 5 कोटींची खंडणी मागणारे जेरबंद

Bibvewadi-Police-Station

पुणे : Bibvewadi Pune Crime News | घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखवून पुजारी व त्यांचे शिष्य यांना विजापूरला घेऊन जाऊन डांबून ठेवून ५ कोटींची खंडणी मागणार्‍या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) जेरबंद केले आहे. रामु अप्पाराम बळुन (वय २९, रा. त्रिकुंडी, ता. जत, जि. सांगली), दत्ता शिवाजी करे (वय २०, रा. त्रिकुंडी ता. जत, जि. सांगली), हर्षद सुरेश पाटील (वय २२, रा. आसंगी, ता. जत, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Arrest In Kidnapping Case)

https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv

आरोपी हे फिर्यादी यांचे घरी २९ सप्टेबर रोजी आले. फिर्यादीचा मुलाला भेटून विजापूर येथे घराची पुजा करायची आहे, असे आमिष दाखविले. Eकर्नाटक येथे पुजारी व त्यांचे सोबतचे शिष्य यांना घेऊन गेले. पिस्तुल व हत्यारांचा धाक दाखवून अपहरण करुन ५ कोटींच्या खंडणीसाठी (xtortion Case) त्यांना डांबुन ठेवले होते.

https://www.instagram.com/p/DBA2jpoJCg3

या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाला आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना कर्नाटकामधील सिंधनूर जवळ डांबून ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार सुमीत ताकपेरे, जोतीष काळे यांचे पथक रवाना झाले. सिंधनूर येथे पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी केले असता आरोपींनी पुजारी व त्यांचे शिष्यांना एका निर्जन ठिकाणी असलेल्या रुममध्ये डांबुन ठेवले होते. पोलिसांना पाहून आरोपी पळून जात होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिबवेवाडी पोलिसांनी हत्यारासह ताब्यात घेतले. पुजारी व त्यांच्या ३ शिष्यांची सुटका केली. तसेच आरोपींनी आणखी ४ शिष्याना दुसरीकडे डांबून ठेवले होते. त्यांचीही सुटका केली. अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली.

https://www.instagram.com/p/DBBAn7giAlj/?img_index=1

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा,
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे,
गुन्हे मनोजकुमार लोंढे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संजय गायकवाड,
संतोष जाधव, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले,
विशाल जाधव, नितीन कातुर्डे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DBA_AD5pSJg

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed