Pune Pimpri ACB Trap Case | अपघात आपसात मिटवून देण्यासाठी लाच घेताना हवालदार जाळ्यात; एसीबीची पुनावळेत कारवाई
पुणे : Pune Pimpri ACB Trap Case | अपघात झाल्यानंतर आपसात मिटवून देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय ४४, नेमणूक-रावेत पोलीस ठाणे Ravet Police Station) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Pimpri Bribe Case)
https://www.instagram.com/p/DBBTGBuJXpK
याबाबत एका ५७ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एक मोटार सायकलस्वार यांच्यात पुनावळे येथे अपघात झाला होता. हवालदार ज्ञानदेव बगाडे यांच्याकडे त्याचा तपास आला होता. या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून आपसात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.
https://www.instagram.com/p/DBBQCZPJx0C
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आली. त्याची पडताळणी करताना बगाडे लाच मागत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पुनवळे येथील गंधर्व हॉटेलसमोर तक्रारदार यांना बोलावले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये स्वीकारताना बगाडे याला पकडण्यात आले. रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन बगाडे याला अटक करण्यात आली.
https://www.instagram.com/p/DBA_AD5pSJg
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत.
https://www.instagram.com/p/DBBAn7giAlj/?img_index=1
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार
