Shivsena Shinde Group On Sanjay Raut | संजय राऊत म्हणजे ‘हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची जहरी टीका

sanjay-raut-Gulabrao-Patil

मुंबई: Shivsena Shinde Group On Sanjay Raut | दसरा मेळाव्यावरून (Shivsena Dasara Melava 2024) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. जनता ही मूळ शिवसेनेच्या सोबतच आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी डुप्लिकेट लोक खूप येत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. (Gulabrao Patil On Sanjay Raut)

https://www.instagram.com/p/DBBZTltiYEa

गुलाबराव पाटील म्हणाले, ” संजय राऊत स्वत:ला काय समजतात हेच कळत नाही. बाळासाहेबांची अ‍ॅक्टींग करतात काय, मफलर इथे तिथे फिरवतात काय, गालावर हात ठेवतात काय, त्यांना आता कोणी प्रतिस्पर्धी उरलेला नाही. उद्धव साहेबांनंतर त्यांचाच नंबर आहे असं त्यांना वाटू लागलं आहे.

https://www.instagram.com/p/DBBUyiRiV0Y

कधी ते ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडून आले नाही. काय तर फक्त भाषण चांगलं करतात, पण या लोकांमुळेच ही संघटना गेली आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले,” गद्दार हा त्यांचा कॉमन शब्द आहे. विकासाबाबत त्यांच्याकडे शब्द नाहीत. पिक्चर संपलाय आता, गद्दार, खोके हे शब्द आता घासून गेलेले आहेत. संजय राऊत म्हणजे ‘हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे’ अशा पद्धतीचा तो माणूस आहे.

https://www.instagram.com/p/DBBTGBuJXpK

राऊत बाळासाहेबांची स्टाईल करायला जातात. ते शब्द बाळासाहेबांच्या मुखातच चांगले वाटतात. हे कोण होते, कसे वर आले, कोणाच्या मतांवर खासदार झाले हेही सांगा. गद्दारांची मतं घेतली म्हणून ते दिल्लीत गेले. एवढीच खार असेल तर राजीनामा देऊन राऊतांनी खुद्दारी करून दाखवावी. मात्र ते देणार नाहीत”, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

https://www.instagram.com/p/DBBQCZPJx0C

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

Sharad Pawar NCP – Dhananjay Munde | शरद पवार धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम करणार?; परळीत नव्या दमाचा उमेदवार रिंगणात उतरणार

Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्‍या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार

Ali Daruwala | भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला यांची पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या नियामक मंडळावर सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती

You may have missed