Jaykumar Gore On Ramraje Naik Nimbalkar | भाजप नेत्याचा रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा; म्हणाले – ‘रामराजेंना झोपेतही मीच दिसतो, शेवटी बायको…’

फलटण: Jaykumar Gore On Ramraje Naik Nimbalkar | सातारा जिल्ह्यातील (Satara District) दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील ४२ गावांची टेंभू प्रकल्पांतर्गत माण खटाव उपसा सिंचन योजनेचे विखळे येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप येळगावकर उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/DBBi1TiJJAK
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरेचा रामराजेंना प्रचंड राग आहे. जयकुमार गोरे हा रामराजेंना एवढा टोचतो, एवढा टोचतो की झोपेत सुद्धा जयकुमार गोरेच्या नावाने रामराजे चावळत असतात, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
https://www.instagram.com/p/DBBQCZPJx0C
विखळे येथे जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “रामराजे नाईक निंबाळकर यांना जिकडे तिकडे मीच दिसतो. रामराजे झोपेत सुद्धा जयकुमार गोरेच्या नावाने चावळतात. शेवटी बायको झोपेतून उठून सांगते, जयकुमार गोरे नाही मी आहे इथं…”असे म्हणत आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषद माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
https://www.instagram.com/p/DBA_AD5pSJg
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार