ED Action On Mangaldas Bandal | मंगलदास बांदलसह नातेवाईकांची ईडीने जप्त केली 85 कोटींची मालमत्ता

पुणे : ED Action On Mangaldas Bandal | जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर येथील बुरुंजवाडी आणि महंमदवाडी येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकून केलेल्या कारवाईत कागदपत्रे जप्त केली होती. त्या आधारे ईडीने मंगलदास बांदल याच्यासह हनुमंत संभाजी केमधरे, सतीश जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांची पुणे, सोलापूर, अहमदनगर येथील ८५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Pune) नोंदविलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरु केला. बांदल याच्यासह अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, इतर बँक अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनी लाँडिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी अंतर्गत ईडीने तपास सुरु केला होता.
मंगलदार बांदल याने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून २००८ मध्ये कर्ज घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. आपल्या प्रभावातून मंगलदास बांदल याने स्थानिक शेतकर्यांच्या जमिनीच्या किंमती वास्तव्यापेक्षा अधिक मुल्यांकन करुन कर्ज वाटप करायला लावल्याचे बँकेच्या फॉरेन्सिक आॅडीटमधून समोर आले आहे. अनिल भोसले याच्याशी बांदल हा निकटवर्ती असल्याने हे कर्ज मंजुर केली गेली. ही कर्जे मंजूर करुन देण्यात हनुमंत केमधरे याचा महत्वाचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. २००७ ते २०१३ या काळात ही बोगस कर्ज मंजूर करण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि कर्ज अधीक्षक म्हणून त्याने आपल्या पदाचा गैरवापर करुन कर्जाची शिफारस केल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले आहे.
बांदल यांच्याविरुद्ध यापूर्वी प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती. बेकायदा आर्थिक व्यवहार प्रकरणी शिक्रापूर व महंमदवाडी येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर बांदल याला अटक करण्यात आली होती. बांदल याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) एका सराफ व्यावसायिकाला धमकाविल्याप्रकरणी मोक्का कारवाई केली होती. (Pune Police MCOCA Action)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hadapsar Pune Crime News | 76 वर्षाच्या वृद्धाची अगतिकता लक्षात न घेता तरुणाने डोके भिंतीला आपटून
केले जखमी; नेमका काय झाला प्रकार वाचा सविस्तर
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’