Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ” जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

sharad-pawar-jayant-patil

सांगली: Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा शिवस्वराज्य यात्रेचा (Shivswaraj Yatra) समारोप काल (दि.१६) इस्लामपूरमध्ये झाला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ही ज्यांच्यामध्ये असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंत पाटील, असे म्हणत शरद पवारांनी सूचक भाष्य केले. दरम्यान आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जयंत पाटलांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार, अशा आशयाने या ,विधानाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

शरद पवार म्हणाले, ” मी एवढंच सांगतो. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो. देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असे सांगत शरद पवारांनी सूचक विधान केले.

“कारण साखराळे गाव ऐतिहासिक गाव आहे. या गावात साखर कारखाना उभा करण्याचे काम राजाराम बापूंनी केलं होतं. याच साखराळे गावात आपण जमतोय. यामधून याच भागातील सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील तरुण पिढी शक्ती त्यांच्या पाठीशी राहिल, हा विश्वास याठिकाणी व्यक्त करतो “, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.

ते पुढे म्हणाले, ” मला एका गोष्टीचा आनंद आहे की, हे सगळं काम करण्यासाठी आज जयंतराव
ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. काम करत आहेत. कष्ट करत आहेत.
लोकांना विश्वास देत आहेत. दिलासा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी
एका विचाराने निश्चित पुढे जाईल”, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

“मला आनंद आहे की, आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी,
सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे.
त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल”, असे शरद पवार यांनी म्हंटले.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | 76 वर्षाच्या वृद्धाची अगतिकता लक्षात न घेता तरुणाने डोके भिंतीला आपटून
केले जखमी; नेमका काय झाला प्रकार वाचा सविस्तर

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed