Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा; अनेकांनी दिल्या मुलाखती

पिंपरी: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी, दौऱ्याला वेग आला आहे. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) रस्सीखेच सुरु आहे. काही जागांवर निर्णय झाला असला तरी काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असणार आहे. दरम्यान काँग्रेसकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
काँग्रेसने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शहरातील मतदारसंघ काँग्रेसला घेण्यासाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri Chinchwad) काँग्रेसकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज केले होते.
पुण्यातील काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे पिंपरी (Pimpri Assembly), चिंचवड (Chinchwad Assembly) व भोसरी (Bhosari Assembly) मतदारसंघातील उमेदवारांच्या निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मुलाखती घेतल्या. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम (Kailas Kadam), पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), पुणे लोकसभा निरीक्षक अजित दरेकर (Ajit Darekar) आदी उपस्थित होते.
चिंचवड मतदारसंघातून डॉ. कैलास कदम, संदेश नवले, तुकाराम भोंडवे, प्रियंका मलशेट्टी – कदम, सज्जी वर्की, सायली नढे, शशी नायर, राजन नायर, भरत वाल्हेकर यांनी तर पिंपरी मतदार संघातून विश्वनाथ जगताप, मनोज कांबळे, बाबासाहेब बनसोडे, गौतम आरकडे, शामला सोनवणे, ज्योती गायकवाड, डॉ. मनीषा गरुड, चंद्रकांत लोंढे, पंकज बगाडे, अर्चना राऊत आणि भोसरी मतदार संघातून सोमनाथ शेळके, विठ्ठल शिंदे, स्मिता पवार यांनी मुलाखती दिल्या.
कैलास कदम म्हणाले , इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींना साद घातली.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’