Pune Crime News | पुणे: मावशीच्या 17 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर केला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना मावशीच्या १७वर्षाच्या मुलाने तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पोस्को अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी ही घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा घरात आला. त्याने या मुलीचे कपडे काढून टाकले. तिने आरडाओरडा करु नये, म्हणून तोंडाला रुमाल बांधला. चाकूने मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. कोणास काही सांगितले तर मारुन टाकीन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”
Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’