Pune Crime News | पुणे: भंगार गोळा करण्यासाठीही आता गुंडांना द्यावा लागतो हप्ता ! चाकूचा धाक दाखवून खिशातील पैसे घेतले काढून

पुणे : Pune Crime News | आपल्या एरियातील दुकानदार, रस्त्यावरील विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून गुंड, भाई हप्ते वसुली (Hapta Vasuli) करत असतात. हातगाडीवर फिरुन भंगार विकत घेणार्यांवर ही गुंडाची वक्र दृष्टी आता पडली आहे. आमच्या एरियामध्ये भंगार गोळा करायचे असेल तर तुला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्याला जखमी करण्याचा प्रकार खडकीत घडला. (Robbery Case)
अन्वर शहा हबीब (वय ३४, रा. पवार वस्ती, दापोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अदनान कुरेशी (रा. खडकी) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अदनान कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड आहे. त्याविरोधात खडकी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, चोरी, जबरी चोरी, पोस्को असे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. हा प्रकार खडकीतील राजीव गांधी झोपडपट्टीजवळ रेल्वे मार्गाच्या बाजूला १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भंगार विकत घेऊन जात होते. त्यांना अदनान कुरेशी याने अडवले. फिर्यादीच्या जवळ येऊन कॉलर पकडून शिवीगाळ केली. आमच्या एरियामध्ये तुला भंगार गोळा करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील. असे बोलून त्याने हातातील चाकू काढून फिर्यादीच्या पोटाला लावला. शर्टाचा खिसा फाडून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. फिर्यादी यांनी विरोध केला असता त्याने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या कानाच्या बाजूला मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत. (Pune Crime News)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”
Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती
Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’