Ajit Pawar NCP | अजित पवारांना धक्का ! राष्ट्रवादी पक्षाच्या पुण्यातील आणखी 250 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ajit Pawar Offset

पुणे: Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अजित पवार यांची त्यांचे अनेक शिलेदार साथ सोडताना दिसत आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी पुण्यातुन शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांची वर्णी लागावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मानकर यांना डावलण्यात आले, परिणामी पहिल्याच दिवशी ६०० पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे देत नाराजी व्यक्त केली होती.

पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी न दिल्याने पदाधिकारी नाराज आहेत. मानकर यांच्या आणखी २५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या विविध पदावरून राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता ८५० वर पोहोचली असून शनिवार पर्यंत ही संख्या वाढू शकते.

दीपक मानकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” पक्षफुटीनंतर नव्या जोमाने पक्ष व संघटना बांधणीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले. १६०० जणांची जम्बो कार्यकारिणी आमची आहे. हजारो कार्यक्रम घेऊन पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. असे असताना, पक्षाने संधी न दिल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाने मला ताकद दिली, तर कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे, याचा पक्षाला विसर पडत आहे”, अशी प्रतिक्रिया मानकर यांनी दिली.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed