Ravet Pune Crime News | पुणे: कलयुग ! सॉफ्टवेअर इंजिनिअरने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या ३० वर्षाच्या पत्नीसोबत लैंगिक अत्याचार करायला सांगून स्वत: केले व्हिडिओ चित्रीकरण

पुणे / पिंपरी : Ravet Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनिअरने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीसोबत तिघांना वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करायला सांगून त्याचे स्वत: व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचवेळी त्याने आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. (Ravet Pune Crime News)
याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ दरम्यान घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिचा पती हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते पुनावळेत राहतात. तिच्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. या अत्याचाराची अश्लिल चित्रफित तयार केली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच तिच्यासमवेत त्याने अनैसर्गिक कृत्यही केले. त्याला तिने विरोध केल्यावर
त्याने तिला शिवीगाळ केली. त्याच्या या कृत्यामुळे त्रासलेल्या पीडिताने शेवटी
पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. रावेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’
Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय
एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी