Pune Crime News | लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे पुण्यातील सराफ व्यावसायिकाला 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

पुणे : Pune Crime News | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar NCP), माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi Gang) नाव चर्चेत आहे. दरम्यान आता पुण्यातील सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा (Extortion Case) प्रकार शनिवारी (दि.१९) समोर आला आहे. खंडणीसाठी धमकावणारा ई-मेल पाठविण्यात आला असून, या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
‘लाॅरेन्स बिष्णोई टोळीला दहा कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास बाबा सिद्दीकी प्रमाणे अवस्था करु. खंडणीची रक्कम कधी आणि कशाप्रकारे द्यायची, याबाबतची माहिती दुसरा मेल पाठवून देऊ’, अशी धमकी ईमेल द्वारे देण्यात आली आहे.
ईमेल पाठविणाऱ्याचा सायबर गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. बिष्णोई टोळीच्या नावे दिल्ली, चंदीगड मधील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (Pune Crime News)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?