Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना आणखी एक धक्का; 5 माजी नगरसेवक साथ सोडणार; चेतन तुपेंना आव्हान?

पुणे : Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असताना अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे (Anand Alkunte) हडपसर विधानसभा (Hadapsar Assembly) मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
विद्यमान आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत. सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पीएमपीएलचे (PMPML) माजी संचालक म्हणून ही काम केले आहे.
हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Ajit Pawar NCP)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?