Shivsena Thackeray Group | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हात बदल?

मुंबई : Shivsena Thackeray Group | शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन वेगळे पक्ष तयार झाले. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंना दिले होते. तर ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिले होते. (Uddhav Thackeray’s Party News Modified Symbol)
या चिन्हामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल करण्याची मागणी केली होती. त्यात निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह देण्यात आले आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालच चिन्ह कायम ठेवण्यात आले असून आईस्क्रीमच्या कोनासारखे वाटणारे चिन्ह आता बॅटरी सारखे दिसणार आहे. मशाल हातात धरण्याचा जो आकार होता तो आईस्क्रीमच्या कोनासारखा वाटत होता. तो बदलून आता वरती पेटत्या ज्वाला आणि खाली बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच आतील भगवा रंग काढण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती.
मशाल हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसते असे विरोधकांनी म्हटले होते.
यामुळे हा बदल करण्यात आला आहे. (Shivsena Thackeray Group)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?