Maharashtra Assembly Election 2024 | भाजपच्या ९९ उमेदवारांच्या यादीत खडकवासला, पुणे कॅंटोन्मेंटच्या विद्यमान आमदारांचे नाव नाही, विद्यमान आमदारांना डावलणार की ‘हे’ मतदारसंघ मित्रपक्षाच्या वाट्याला? तर कसबा मतदारसंघाबाबत विविध तर्कवितर्क

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे तीन -तीन पक्षांचा समावेश आहे.
राज्यात पहिल्यांदाच भाजपा (BJP) दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
यामध्ये पुण्यातील कोथरूड विधानसभा (Kothrud Assembly) मतदारसंघातून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तर पर्वती विधानसभा (Parvati Assembly) मतदारसंघातून माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे. मात्र, खडकवासला (Khadakwasla Assembly) आणि पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा (Pune Cantonment Assembly) मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने या जागा महायुतीतील मित्रपक्षांच्या वाट्याला जाणार की काय? अशा चर्चेला उधाण आले आहे
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) आहेत. खडकवासल्यात त्यांच्या विरोधातही पक्षांतर्गत मोठी नाराजी दिसून येत आहे. या मतदारसंघातील नगरसेवकांनी आमदारांच्या विरोधात बैठकही घेतली. खडकवासला हातातून जाऊ द्यायचा नसेल तर विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नका, असा सूर या मतदारसंघात आहे.
त्यातच पुण्याचे माजी महापौर असणारे दत्तात्रय धनकवडे (Dattatray Dhankawade) सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) आहेत. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचे म्हणत महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. या मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपाला निसटता विजय मिळाला होता.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून कांबळे बंधूंनाच आलटून-पालटून किती वेळा उमेदवारी देणार? गेल्या निवडणुकीत सुनिल कांबळे (Sunil Kamble MLA) निसटत्या मतांनी निवडून आले आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेला तर या मतदारसंघातून पीछेहाट झाली असल्याचा पक्षाच्या बैठकीत सुर होता.
त्यामुळे खडकवासला बरोबरच पुणे कॅन्टोन्मेंट महायुतीतील मित्रपक्षाकडे जाणार की विद्यमान आमदारांना डावलणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
भाजपने आज जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत या विद्यमान आमदारांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
तर कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Assembly) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पोस्टर
वॉर रंगल्याचे चित्र कसबा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) हे कसब्यातून लढण्यासाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत.
तर शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्याकडून देखील उमेदवारीवर दावा ठोकण्यात आला आहे.
रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
पोटनिवडणुकीत पराभव होऊन देखील हेमंत रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिला.
दुसरीकडे शहराध्यक्ष असणारे धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कसब्यातून कुणाल टिळक (Kunal Tilak) हे देखील इच्छुक आहेत,
दरम्यान, उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची याबाबत पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?