MVA Seat Sharing Formula | काँग्रेस- शिवसेना ठाकरे वादात शरद पवारांची मध्यस्थी सकारात्मक; जागावाटपाचा तिढा सुटला

sharad pawar-uddhav thackeray-nana patole

मुंबई: MVA Seat Sharing Formula | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झालेली आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.

दरम्यान, काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची (Maharashtra Congress Leaders) तक्रार ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) दिल्ली दरबारी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद मिटला नाही.

आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील वाद मिटवण्यात शरद पवारांना यश आल्याची माहिती आहे. जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दिल्लीमध्ये हा वाद पोहचला होता. ठाकरेंबद्दल काँग्रेसकडून दिल्लीत तक्रारीचा पाढा वाचण्यात आला होता. तर मातोश्रीवर ठाकरेंनी आमदारांना एकत्र बोलवत टोकाची भूमिका घेण्याची तयारी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोनाफोनी करत या वादाला पूर्णविराम दिला आहे. ठाकरे-काँग्रेस यांच्यातील वाद शरद पवारांना मिटवण्यात यश आले आहे. मंगळवारी (दि.२२) मविआची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काल रात्रीपर्यंत मुंबईत बैठकांचे सत्र सुरु होते. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून वाद असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जागा वाटपातील चर्चेतील भाषा हे देखील एक कारण असल्याची माहिती आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकांमध्ये सौम्य भाषेत चर्चा करत नाहीत. नाना पटोले एकेरी भाषेचा वापर करतात, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.रविवारी आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली. यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी भूमिका घेत आपापसात वाद न घालता हायकमांडने या जागांवर लक्ष घालावे असा निर्णय घेतला.

या सगळ्या वादात शरद पवार यांनी मध्यस्थी करावी असं ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांकडून विनंती करण्यात आली. यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान काँग्रेस हायकमांडशी झालेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जयंत पाटील स्वतः मातोश्रीवर गेले होते. पवारांची मध्यस्थी सकारात्मक झाली असून महाविकास आघाडीचे जागावाटप आज किंवा उद्या होणार असल्याची माहिती आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed