Lawrence Bishnoi | लॉरेन्स बिश्नोईला थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर; जाणून घ्या कोणी दिली ऑफर

Lawrence Bishnoi

पुणेरी आवाज – Lawrence Bishnoi | राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर (Baba Siddique Murder Case) आता देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आहे. अशातच त्याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवण्याची ऑफर आली आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.

पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची गँग आता महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे. त्याच्या गँगने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची नुकतीच हत्या केली. त्याच्या गँगकडून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) देखील वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धुवून लागला आहे. सध्या बिश्नोई गुजरातमधील साबरमती कारागृहात सर्वात सुरक्षीत अंडा सेलमध्ये कैद आहे.

या पक्षाने दिली बिश्नोईला ऑफर

वांद्रे पूर्व विधानसभा मधून आमदार झिशान सिद्दीकी (Zishan Siddique) विरोधात लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेकडून (Uttar Bhartiya Vikas Sena) लॉरेन्स बिश्नोईला ऑफर आली आहे. उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

बाबा सिद्दीकी देशभक्त नाही, लॉरेन्स बिश्नोई देशभक्त आहे. तर लॉरेन्स बिश्नोई हा उत्तर भारतीय समाजाचा आहे. बिश्नोईमध्ये आम्हाला शहीद भगत सिंग दिसतो. त्यामुळे निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा, अशी विनंती केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून गुजरात येथील साबरमती जेल प्रशासनाला निवेदन लिहून मागणी करण्यात आली आह. उत्तर भारतीय विकास सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईला पूर्ण पाठिंबा आहे. असे पक्षात म्हटले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

You may have missed