Dadar Mahim Assembly Constituency | अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा शिलेदार ठरला; माहीम मतदारसंघात होणार तिहेरी लढत

raj-and-uddhav-thackeray

मुंबई: Dadar Mahim Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजलं आहे. यंदाची निवडणूक रंजक असणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) त्याचबरोबर तिसरी आघाडी, वंचित, मनसे त्याचबरोबर अन्य पक्षांचेही उमदेवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे मतदारांना अधिकचे पर्याय उपलब्ध असले तरी नेमकं मतदान कोणाला करायचं हा प्रश्नही असणार आहे. (Dadar Mahim Assembly Constituency)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना उमदेवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena Thackeray Group) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून (Shivsena Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

पक्षात झालेल्या बंडानंतर यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक जागा मिळवणं ठाकरेंसाठी आव्हान तर आहेच, पण तितकंच त्यांच्या पक्षासाठीही महत्त्वाचं आहे. तसेच, माहीम म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणं ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्यानं त्याठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांनी मोठ्या मताधिक्याने वरळीमधून विजय मिळवला होता. त्यावेळी मनसेनं मात्र,
वरळीत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे माहीम मधून जर अमित ठाकरे
यांना उमेदवारी देण्यात आली. तर ठाकरे गटाकडूनसुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये,
असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे गटात आग्रही होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mundhwa Pune Crime News | मराठी भाषेच्या अज्ञानामुळे तरुणीची फसवणूक ! संमतीपत्र सांगून कुलमुख्य्त्यार पत्रावर घेतली सही, 1 कोटींच्या मालमत्तेचा केला व्यवहार

You may have missed