Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर, महाविकास आघाडीचं घोडं कुठं अडलं? नाना पटोले म्हणाले…

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले (Mahayuti Seat Sharing Formula) असल्याची माहिती आहे. भाजपने (BJP) ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे तर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं (MVA Seat Sharing Formula) घोडं नेमकं अडलं कुठं ? असा प्रश्न विचारला जात आहे. (Mahavikas Aghadi)
दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्या (दि.२४) आम्ही आमचं जागावाटप जाहीर करू. चार ते पाच जागांवर थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आम्ही काल सर्व पक्षांनी मिळून चर्चा केली व त्यावर तोडगा काढला”, असे महत्वाचे विधान पटोले यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शुक्रवारी, शनिवारी, रविवारी आणि मंगळवारी महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे आणि इतर नेते उपस्थित होते. आतापर्यंत २८० जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांचा तिढा सोडवून उद्या (दि.२४) जागावाटप जाहीर होणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा