Maharashtra Assembly Election 2024 | ‘यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून ४ हजार कोटींचा चुराडा’, ‘महाविकास आघाडी’च्या नेत्याचा खळबळजनक दावा

Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar

पंढरपूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी अगदी थोडे दिवस बाकी राहिले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार मतदारसंघात भेटीगाठी घेताना दिसत आहेत. यंदा काही करून महायुतीला (Mahayuti) सत्ता टिकवून ठेवायची आहे तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला ३० ते ४० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. या निवडणुकीत सुमारे ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा चुराडा होईल, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ” आमच्या विरोधात दबावतंत्र येणार आहे. गुंडांची ताकद वापरली जाणार आहे. एवढी मोठी महाशक्ती आमच्या विरोधात असतानाही जनता, सामान्य कार्यकर्ता आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडी १८० जागांवर मुसंडी मारेल.

आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीचे जागा वाटप होईल. सांगोल्यात शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्यासाठी आपण प्रचार सभा घेऊ” असे सांगत डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांच्या पाठीशी आपण ठामपणे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Constituency | जोरदार शक्तीप्रदर्शन आणि कोथरुडकरांची साथ ! चंद्रकांत पाटील यांनी दिग्गजांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज (Video)

Pune PMC News | आगीच्या घटनेमुळे मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची अग्निशामक दलामार्फत तपासणी मोहीम सुरु

Pune PMC News | एसटीपीतील पाणी तळजाई वनविभागाला देता येईल? महापालिकेची वन विभागासोबत चर्चा सुरू

You may have missed