Pune Police News | पुणे: पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली? शहरात सर्वत्र अवैध सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड, मटका किंग नंदू नाईकसह अनेकांना अटक

पुणे : Pune Police News | शहरातील सर्व अवैध धंदे (Illegal Business In Pune) ) बंद असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी जाहीर केले होते. मात्र, आचार संहिता लागू होताच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली. त्यातून शहरात सर्वत्र हातभट्टी दारु विक्री, बेकायदेशीर मटका, जुगारचे अड्डे सर्रासपणे सुरु असल्याचे दिसून आले. दररोज पोलीस अनेक बेकायदा दारु धंदे व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी शहर पोलीस दलाने चार ठिकाणी धाडी टाकून मटका किंग नंदू नाईक याच्यासह अनेकांना अटक करुन लाखो रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. (Pune Police News)
शुक्रवार पेठेतील रौनक बार अँड रेस्टोचे वरील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये खडक पोलिसांनी (Khadak Police) शुक्रवारी सकाळी धाड टाकली. मटका किंन नंदू नाईक याच्या सांगण्यावरुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन कल्याण, वरळी, मुंबई नावाचे मटका जुगार खेळत असताना चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ हजार १०५ रुपयांचे साहित्य जप्त केले.
चरण भारत देवघे (वय ३६, रा. वाघजाईनगर, कात्रज), करण जितेंद्र मोदी (वय ३०, रा. बालाजीनगर, कात्रज), किरण विठ्ठल खाळुंखे (रा. बालाजीनगर) आणि मटका किंग नंदकुमार बाबुराव नाईक Nandkumar Baburao Naik (रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली आहे.
रास्ता पेठेतील कुमार सदर बिल्डिंगजवळील बोळामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा घातला. कल्याण ओपन नावाचा मटका खेळत असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून ५ हजार ५० रुपये रोकड व जुगाराची साधने जप्त केली़.संदीप लक्ष्मण चव्हाण (वय ३४, रा. कसबा पेठ), नजीर सईद अली शेख (वय ३७, रा. मंगळवार पेठ), रुपेश राजेंद्र नाईक (वय ४०, रा. सोमवार पेठ), सतिश आत्माराम जाधव (वय ५०, रा. कसारा हाऊस) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Nandu Naik Mataka King)
पुणे स्टेशन रोडवरील ससून हॉस्पिटल, मेन गेटच्या समोर फुटपाथवर सुरु असलेल्या
मटका जुगारावर बंडगार्डन पोलिसांनी छापा घातला.
गजेंद्र बसवणप्पा यागंटी (वय ५०, रा. गायकवाड वाडा, वडगाव शेरी) याला अटक केली आहे.
या जुगार धंद्याचा मालक राहुल शेळके याच्या आर्थिक फायद्यासाठी
लोकांकडून पैसे स्वीकारुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत व खेळत
असताना त्याच्याकडून १३८० रुपये रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
शुक्रवार पेठेतील जनसेवा इमारतीमधील टेरसवरील नंदू नाईक याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा घालून ६० जणांना ताब्यात घेतले. तेथून १ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण