Pimpri-Chinchwad-Bhosari Assembly Election 2024 | पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ठरले; मविआत पेच कायम; मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

Mahavikas-Aghadi

पिंपरी: Pimpri-Chinchwad-Bhosari Assembly Election 2024 | पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात भाजपचे उमेदवार ठरले आहेत (BJP Candidates) . दरम्यान महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) या जागांना घेऊन अद्याप तिढा असल्याची माहिती आहे. या मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) पिंपरीतून आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode), भाजपने चिंचवड मधून शंकर जगताप (Shankar Jagtap) आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात पिंपरी -चिंचवडमधील एकाही मतदारसंघाचा समावेश नाही. काँग्रेसला शहरातील एकही मतदारसंघ मिळण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. तर, शिवसेना ठाकरे पक्षाचा (Shivsena Thackeray Group) पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे.

पिंपरी मतदारसंघात माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत (Sulakshana Shilwant) यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अण्णा बनसोडे यांचा पराभव करण्यासाठी आक्रमक, सक्षम चेहरा द्यावा अशी मागणी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची गुरुवारी रात्री भेट घेतली.

भाजपच्या माजी नगरसेविका, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे (Seema Savle) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दोघींपैंकी उमेदवारी कोणाला द्यायची यावर तोडगा निघाला नाही.

चिंचवडमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्यासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) इच्छुक आहेत. कलाटे, नाना काटे (Nana Kate), चंद्रकांत नखाते (Chandrakant Nakhate) यांनी ‘तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याचे काम करण्याची ग्वाही शरद पवार यांना दिली आहे. परंतु, अद्याप जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे निश्चित झालेले नाही.

भोसरीमधून शिवसेना ठाकरे गटात पक्षात भाजपमधून प्रवेश केलेले रवी लांडगे इच्छुक आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले अजित गव्हाणेही (Ajit Gavhane) तुतारीवर (Tutari) लढण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिढा वाढला आहे. दरम्यान तोडगा काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. तोडगा न निघाल्यास तिन्हींपैकी एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed