Sharad Pawar NCP | माढा, पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघातील शरद पवारांचे उमेदवार गुलदस्त्यात; पवारांची नेमकी रणनीती काय? राजकीय वर्तुळात चर्चा

sharad-pawar

मुंबई: Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. यामध्ये माढा (Madha Assembly Election 2024), पंढरपूर (Pandharpur Assembly Election 2024) आणि मोहोळ (Mohol Assembly Election 2024) या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात शरद पवार यांची नेमकी रणनीती काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या तिन्ही मतदारसंघात तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) यांचे पुत्र अभिजीत ढोबळे (Abhijit Dhobale), संजय क्षीरसागर, तसेच रमेश कदम (Ramesh Kadam) हे इच्छुक आहेत.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडून प्रशांत परिचारक यांचे नाव देखील चर्चेत आहे.

तर माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, तसेच अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे, ऍड. मिनल साठे यांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed