Pune Pimpri Chinchwad Crime News | डीआरडीओ ऑफिसर्स हौसिंग सोसायटीच्या जमिनीची बेकायदेशीररित्या विक्री; सोसायटी चेअरमनसह 8 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | डीआरडीओ ऑफिसर्स को-ऑप हौसिंग सोसायटीच्या (DRDO Officers Co-op Housing Society) नावाचा गैरवापर करुन सभासद नसलेल्यांना सभासद करुन घेऊन त्यांना बेकायदेशीरपणे जमिन विक्री करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेअरमन रणजितकुमार सूर, सेक्रेटरी देबाशिष चक्रवर्ती, विद्या आनंद बगनेरा, नरेश नरेंद्र मसे, शैलेश रामराव गुरनुले, श्री खयाली राम कुलारी, नितीन चंद्रकांत जवळकर व त्यांना मदत करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चेतन रमेश डवरे (वय ४३, रा. आरमामेंट इस्टेट, कर्नल पॉईट, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा राम देव ओंकार (डीआरडीओ) को ऑप सोसायटीची सुस येथे जमीन आहे. या जागेच्या विक्रीची कोणतीही लेखी परवानगी तसेच सोसायटीचे कोणतेही सभासद नसताना सोसायटीच्या नावाचा वापर करुन डुप्लीकेट कागदपत्रे तयार केली.
तसेच सोसायटीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र बनवून ही जागा ही अॅग्रीमेट टु सेल करुन एकूण १ कोटी २६ लाख ७५ हजार रुपयांना नितीन चंद्रकांत जवळकर याच्याशी एप्रिल २०२२ मध्ये विक्रीचा करार केला. नितीन जवळकर याने सोसायटीचे मालकीचे जागेबाबतचा कोणताही सर्च रिपोर्ट न काढता संगनमत करुन सोसायटीचे सभासद नसलेले आरोपींना सोसायटीचे खोटे लेटर हेडचा वापर करुन सोसायटीचे ठराव तसेच रजिस्टर सोसायटीचे नाव, पत्ता, शिक्के यांचा वापर करुन सभासदाच्या वहिवाटीची जमीन बेकायदेशीररितया विक्री करुन फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण