Pune Politics News | ‘आयात’ उमेदवारांना संधी नको ! काँग्रेस भवन येथे इच्छुकांनी पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर

पुणे : Pune Politics News | काँग्रेस पक्षाची तिसरी उमेदवार यादी प्रसिद्ध झाली असली तरी अद्याप शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly Election 2024) आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे (Pune Cantonment Assembly Election 2024) उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला आहे. या दोन्ही ठिकाणी ‘आयात’ उमेदवारांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांविरुद्ध इच्छुक आणि कार्यकरत्यांमध्ये प्रचंड चीड असून याचा पहिला अंक काल संध्याकाळी काँग्रेस भवन येथे पार पडला.
विशेष असे की या दोन्ही मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला अगदी निसटता पराभव पत्करावा लागला होता. तर नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मधून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना आघाडी मिळाली होती तर शिवाजीनगर मतदार संघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना जेमतेम पाच हजारांचे मताधिक्य मिळवण्यात यश आले होते.
त्यामुळे पक्षातील उमेदवार या दोन्ही ठिकाणी विजय मिळवू शकतो अशी शक्यता असताना शहर कार्यकारणीचे काही पदाधिकारी व राज्यातील त्यांचा गॉडफादर नेता बाहेरील उमेदवारांसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत असा राग इच्छुकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अशातच काल संध्यकाळी मागील निवडणुकीत शिवाजीनगर मतदार संघातून पराभूत झालेले दत्ता बहिरट (Datta Bahirat) आणि अन्य एक ईच्छुक मनीष आनंद (Manish Anand) हे काल संध्याकाळी समर्थकांसह काँग्रेस भवन येथे पोहोचले. पक्षातील इच्छुकांपैकी कोणालाही संधी द्या आम्ही एकत्रित येवून विजय मिळवू परंतु बाहेरील उमेदवार लादू नये, अशी मागणी त्यांनी केली. यावरून शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) व त्यांच्यामध्ये निरिक्षकांसमोरच वाद झाले. या वादाचे पर्यवसन हाणामारी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असतानाच तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिवर नियंत्रण मिळवल्याने पुढील घटना टळली, अशी माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली. (Pune Politics News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण