Sharad Pawar Vs Ajit Pawar | ‘निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार संपलेले दिसतील’, शरद पवार गटातील नेत्याचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘किमान 75 हजार मतांनी मागे असतील’

Ajit Pawar-Sharad Pawar

माळशिरस : Sharad Pawar Vs Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. (Malshiras Assembly Constituency)

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते, अशी टीका शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी केली आहे.

उत्तमराव जानकर म्हणाले, ” बारामती मतदारसंघातून (Baramati Assembly Election 2024) त्यांच्या पत्नीचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला होता. तीच अवस्था आता अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान ७५ हजार मतांनी मागे असल्याचे जानकर यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर राजकारणातून संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या गोठ्याकडे परततील”, असा टोलाही उत्तम जानकर यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष सुरु आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed