Anushakti Nagar Assembly Election 2024 | नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांचा नवा डाव; अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात

Sana Nawab Malik

मुंबई : Anushakti Nagar Assembly Election 2024 | आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने (Ajit Pawar NCP) अणुशक्तीनगर मतदारसंघातून सना मलिक शेख (Sana Malik Shaikh) यांना उमेदवारी दिली आहे. सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा नवाब मलिक (Nawab Malik) यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच अजित पवारांनी सना मलिक यांना तिकीट दिले असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची (Sharad Pawar NCP) तिसरी यादी जाहीर झाली आहे. सना मलिक यांच्या विरोधात बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करचा (Swara Bhaskar) पती फहाद अहमद (Fahad Ahmed) यांना अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

फहाद अहमद यांनी समाजवादी पक्ष (Samajwadi Party) सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. फहाद अहमद यांच्या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे.

“अणुशक्तीनगर मतदारसंघात आमच्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत, मात्र फहाद अहमद हे काही महिन्यांपासून तिकडे स्थानिक आहेत. या उमेदवारीसाठी तेथील निष्ठावंत नाराज आहेत, मात्र राजकारणात संख्येला महत्त्व आहे,” असे जयंत पाटील यांनी म्हंटले.

दरम्यान, शरद पवार गटाने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली आहे. (Anushakti Nagar Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed