Baramati Assembly Election 2024 | युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांचे मोठे भाष्य; म्हणाले – ‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’

Ajit-Pawar-Sharad-Pawar-Supriya-Sule

बारामती: Baramati Assembly Election 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार (Pawar Vs Pawar) असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट आमने- सामने असणार आहेत. दरम्यान आज युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी तुतारीकडून (Tutari) तर अजित पवार यांनी घड्याळ चिन्हाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Ajit Pawar On Sharad Pawar NCP)

दरम्यान याबाबत अजित पवार यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. ते म्हणाले,” लोकशाहीत निवडणुकीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे. माझ्या विरोधात जेव्हा -जेव्हा जे उमेदवार उभे राहिले, ते सर्वच उमेदवार स्ट्रॉंग आहेत असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबाने नेहमीच प्रचार केला. आता या निवडणुकीत देखील बारामतीकर चांगल्या मताधिक्यांनी मला निवडून देतील असा मला विश्वास आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Baramati Assembly Election 2024)

ते पुढे म्हणाले, ” त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. तो त्यांचा अधिकार आहे.
मी त्याबाबत जास्त काही बोलणार नाही. मात्र, त्यांनी असं करायला नको होतं.
लोकसभेच्या निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली,
ती माझी चूक होती. पण तीच चूक पुन्हा त्यांनी करायला नको होती, पण चूक केली आहे.
आता मतदार यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed