Pune Crime Branch News | बेकायदा गांजा बाळगणार्या तिघांना पकडून गुन्हे शाखेने जप्त केला सव्वा किलो गांजा

पुणे : Pune Crime Branch News | बेकायदेशीरपणे विक्री करणार्यासाठी गांजा बाळगणार्या तिघांना पकडून गुन्हे शाखेच्या पथकांनी १ किलो १२९ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार सचिन रमेश माळवे यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश मधुकर वाळुंजकर Ganesh Madhukar Valunjkar (वय ३६, रा. वनराज मित्र मंडळाजवळ, शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Ganja Case)
शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth Pune) वनराज मित्र मंडळाजवळ (Vanraj Mitra Mandal) गणेश वाळुंजकर हा दुचाकीसह रविवारी सायंकाळी पाच वाजता थांबला होता. पोलिसांनी संशयावरुन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे १७ हजार ४० रुपयांचा ८५२ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याबरोबरच १ हजार ५० रुपये रोख, दुचाकी असा ६८ हजार ९० रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत. (Pune Crime Branch News)
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गणेश गोसावी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमिरखान सुधाखान पठाण (वय ४५), शेरखान पठाण (दोघे रा. बिसमिल्ला हॉटेलचे समोर, लोणी रेल्वे स्टेशन गेट जवळ, लोणी काळभोर) यांना अटक केली आहे.
लोणी काळभोर (Loni Kalbhor) मधील लोणी रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर (Loni Railway Station Road)
आरोपी हे स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता बेकायदेशीरपणे ५ हजार ५४० रुपयांचा २७७ ग्रॅम जवळ
बाळगुन विक्री करत होते. पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव (PSI Anil Jadhav) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा